इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी विविध योजना; जिल्हा व्यवस्थापक जे. झेड. राठोड यांचे अर्ज सादर करण्याचे आवाहन

इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी विविध योजना; जिल्हा व्यवस्थापक जे. झेड. राठोड यांचे अर्ज सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.१२ :– महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ आणि त्याच्या उपकंपनी मार्फत इतर मागासवर्गीय समाजाच्या कल्याण, विकास आणि उन्नतीसाठी विविध कर्ज योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक जे. झेड. राठोड यांनी केले आहे.

इतर मागासवर्गीयांच्या कल्याण, विकास व उन्नतीसाठी विविध कर्जयोजना राबविण्यासाठी संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, संत सेनाजी महाराज केशशिप्ली महामंडळ, संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ, संत श्री संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळ, संत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ, स्व. विष्णूपंत रामचंद्र दादरे (लोणारी) आर्थिक विकास महामंडळ, सोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ, श्री संत शिरोमणी नामदेव महाराज समस्त शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळ, संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ, लेवा पाटीदार समाज आर्थिक विकास महामंडळ, सरदार वल्लभभाई पटेल गुजर समाज आर्थिक विकास महामंडळ, आगरी समाज आर्थिक विकास महामंडळ ही महामंडळे कार्यरत आहे.

महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, गट कर्ज व्याज परतावा, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा, कौशल्य प्रशिक्षण विकास, महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा अशा सहा योजना सुरू आहेत. यापैकी कौशल्य प्रशिक्षण विकास आणि महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा या योजना पूर्णतः ऑनलाइन आहेत. अर्ज www.msobcfdc.org वर करणे बंधनकारक आहे. 

बीजभांडवल योजना आणि थेट कर्ज योजना ऑफलाइन असून त्यासाठीचे अर्ज जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शिवाजी हायस्कूलजवळ, दुसरा मजला, खोकडपुरा येथे असलेल्या जिल्हा कार्यालयाशी ०२४०-२३४१५४४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक जे. झेड. राठोड यांनी केले आहे.