आ. अबु आसिम आजमी यांच्या नेतृत्वाखाली कुरैशी समाजाच्या व्यापाऱ्यांसाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना निवेदन

आ. अबु आसिम आजमी यांच्या नेतृत्वाखाली कुरैशी समाजाच्या व्यापाऱ्यांसाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना निवेदन
आ. अबु आसिम आजमी यांच्या नेतृत्वाखाली कुरैशी समाजाच्या व्यापाऱ्यांसाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना निवेदन

महाराष्ट्र वाणी 

मुंबई/धुळे दि १४ जुलै :– महाराष्ट्रातील कुरैशी समाजाच्या कायदेशीर व्यवसायांवर काही कट्टरपंथीयांकडून अडथळे निर्माण केले जात आहेत. समाजाच्या व्यापाऱ्यांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवून त्यांच्याकडून बळजबरीने पैसे वसूल केले जात असल्याचा गंभीर आरोप जमीअत उलेमा धुळेच्या शिष्टमंडळाने केला आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार अबु आसिम आजमी यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधीमंडळाने महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री श्री. योगेश कदम यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर केले.

प्रतिनिधींनी स्पष्टपणे सांगितले की, “कुरैशी समाज कायदेशीर पद्धतीने आपला व्यवसाय करत आहे. परंतु गोरक्षणाच्या नावाखाली काही गट त्यांना त्रास देत आहेत, धमक्या देत आहेत व त्यांच्या उपजीविकेवर गदा आणत आहेत. यामुळे संतप्त होऊन आज संपूर्ण कुरैशी समाज संपावर गेला आहे.”

आ. अबु आजमी आणि शिष्टमंडळाने मंत्री योगेश कदम यांच्याकडे मागणी केली की, या प्रकारांवर त्वरित कारवाई करावी, समाजाच्या कायदेशीर हक्कांचे संरक्षण करावे आणि आरोपींवर कठोर कारवाई करावी.

गृहराज्यमंत्री श्री. कदम यांनी या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत, संबंधित अधिकाऱ्यांना यासंबंधी योग्य ती चौकशी करण्याचे निर्देश दिले.

 अन्यायाविरुद्ध उठलेला आवाज, न्याय मिळेपर्यंत थांबणार नाही.