अंभई जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांचे स्वागत
महाराष्ट्र वाणी
अंभई दि ३० :- सिल्लोड तालुक्यातील अंभई येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा (मराठी) येथे शिक्षकांच्या तीन जागा रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजावर परिणाम होत होता. या रिक्त पदांपैकी दोन पदांवर बदली प्रक्रियेतून श्री. जगताप सर आणि श्री. चोरमारे सर यांनी आज पदभार स्वीकारला.
नवीन शिक्षक शाळेत रुजू झाल्याने विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यानिमित्ताने शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने दोन्ही शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
शाळेतील उर्वरित एक रिक्त जागादेखील लवकरात लवकर भरावी, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.