स्नात्र पूजेनिमित्त पुण्यात धार्मिक उत्साह; चंदननगर जैन मंदिर उभारणीच्या कार्यास गती

महाराष्ट्र वाणी न्युज
पुणे (प्रतिनिधी) दि२८ जून :- स्नात्र पूजा ही जैन धर्मातील एक पवित्र धार्मिक विधी असून ती तीर्थंकरांच्या जन्म, ज्ञानप्राप्ती आणि मोक्षप्राप्तीच्या स्मरणार्थ साजरी केली जाते. या पूजेमध्ये तीर्थंकरांच्या मूर्तीवर अभिषेक केला जातो व त्यांच्या गुणांचा कीर्तनात्मक गौरव केला जातो.
चंदननगर (पुणे) येथील चंदननगर श्वेतांबर मूर्ती पूजक संघातर्फे नव्याने उभारल्या जात असलेल्या जैन मंदिराच्या बांधकाम निमित्ताने स्नात्र पूजेचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक विधीमध्ये दीपक पूजा, अक्षत पूजा, पुरुषोत्तम पूजा अशा विविध पूजांचा समावेश होता.
कार्यक्रमास संघाचे अध्यक्ष डॉ. शांतीलाल बोरा, उपाध्यक्ष अभिजीत मोहनभाई शहा, सचिव परेश कटारिया, खजिनदार प्रवीण संघवी, किरणकुमार कटारिया, सुजल शहा, पार्श्व (सुरज) शहा, कुंदनमल घिसुलाल परमार यांच्यासह अनेक सदस्यांची उपस्थिती होती.
या पूजेद्वारे मंदिर उभारणीच्या कार्यास भक्तिभावातून प्रेरणा मिळाली असून, परिसरात अध्यात्मिक चेतना वाढीस लागली आहे.
– "धर्म, भक्ती आणि सेवाभाव यांचा संगम म्हणजेच ही स्नात्र पूजा!"