सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये सेवा व समाजकार्याचे आयोजन

सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये सेवा व समाजकार्याचे आयोजन
सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये सेवा व समाजकार्याचे आयोजन

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ३० जून :–। महासंसदरत्न खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. हे सर्व कार्यक्रम जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

कार्यक्रमांत खालील उपक्रमांचा समावेश होता:

1. मूर्तिजापूर चिकलठाणा येथील श्री रावसाहेब पाटील प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रमशाळेत अनाथ मुलांना शालेय साहित्य व अल्पोपहाराचे वाटप

2. राष्ट्रवादी भवन, हडको येथे होतकरू विद्यार्थिनीच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा, तसेच संघटनेतील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान

3. हडको परिसरात वृक्षारोपण

4. चिकलठाणा गोशाळेत जनावरांसाठी चारा वाटप

5. जिल्हा रुग्णालयात रुग्ण व नातेवाईकांना फळे व अल्पहार वाटप

6. मुकुंदवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ वृक्षारोपण

या कार्यक्रमांचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष आनंद मगरे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश सरचिटणीस शेख सलीम सर, राजेश पवार, मोतीलाल जगताप, उद्योग व व्यापार आघाडी मराठवाडा अध्यक्ष नितीन शेजवळ, शहर कार्याध्यक्ष आशिष पवार, जिल्हा प्रवक्ते शेख शफीक, विद्यार्थी अध्यक्ष सुशील बोर्डे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सेवा, संस्कार आणि समाजकार्याची नाळ जपणारा हा वाढदिवस लोकांमध्ये चिरकाल लक्षात राहील!