युवकांचा उत्स्फूर्त पाठिंबा, शिवसेनेत सामील शेकडो कार्यकर्ते!चिखलगाव-माझोड परिसरात भगवा फडकण्याची तयारी

युवकांचा उत्स्फूर्त पाठिंबा, शिवसेनेत सामील शेकडो कार्यकर्ते!चिखलगाव-माझोड परिसरात भगवा फडकण्याची तयारी
युवकांचा उत्स्फूर्त पाठिंबा, शिवसेनेत सामील शेकडो कार्यकर्ते!चिखलगाव-माझोड परिसरात भगवा फडकण्याची तयारी

महाराष्ट्र वाणी न्युज 

अकोला दि ६ जुलै ( प्रतिनिधी) :- चिखलगाव व माझोड परिसरातील शेकडो युवक आणि स्थानिक नेतृत्वाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश करून पक्षाला नवे बळ दिले. विविध राजकीय पक्षातील माजी सरपंच, पंचायत समिती सदस्य, उपसरपंच व कार्यकर्ते आता ठाकरे गटात सामील झाले आहेत.

या कार्यक्रमात शिवसेना उपनेते आमदार नितीन देशमुख, माजी आमदार हरिदास भदे, जिल्हाप्रमुख गोपालराव दातकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. या वेळी प्रा. डॉ. संतोष हुशे, विकास पागृत, राहुल कराळे, अभय खुमकर, डॉ. गजानन मानकर, नितीन ताथोड, सुरेंद्र विसपुते, दीपक पाटील, अनिल निकामे, विनोद गवर, महादेवराव भिसे यांच्यासह शिवसेनेचे अन्य स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

माजी पंस सदस्य सचिन थोरात, माजी सरपंच गजानन निलखन, उपसरपंच शिवलाल पाटील ताले यांच्यासह विविध गावांतील तरुण कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांनी यावेळी ठाकरे गटात प्रवेश करत आगामी निवडणुकांत भगवा फडकवण्याचा निर्धार केला.

या पक्षप्रवेशाने चिखलगाव सर्कलमध्ये शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली असून, यामुळे परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शेवटी एकच निर्धार – ‘महाराष्ट्रासाठी भगवा, शिवसेनेसाठी एकवटलेला तरुण वारसा!’