बिडकीनमध्ये महाविकास आघाडीची आढावा बैठक — भूसंपादन, रोजगार व सिंचनाच्या मुद्द्यांवर चर्चा तीव्र

बिडकीनमध्ये महाविकास आघाडीची आढावा बैठक — भूसंपादन, रोजगार व सिंचनाच्या मुद्द्यांवर चर्चा तीव्र
बिडकीनमध्ये महाविकास आघाडीची आढावा बैठक — भूसंपादन, रोजगार व सिंचनाच्या मुद्द्यांवर चर्चा तीव्र

महाराष्ट्र वाणी न्युज 

बिडकीन (ता. पैठण) दि ४ जुलै :- खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या पुढाकाराने बिडकीन येथे महाविकास आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत बिडकीन गटातील प्रलंबित विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला असून, विशेषतः भूसंपादन, रोजगार आणि सिंचन या तीन मुद्द्यांवर केंद्रित चर्चा झाली.

बैठकीत सांगण्यात आले की, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (DMIC) प्रकल्पाअंतर्गत या भागात मोठ्या प्रमाणावर जमीन संपादित करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही सुमारे ३० टक्के भूसंपादनाचे मोबदले प्रलंबित असून, या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला देण्यासाठी प्रयत्नांची दिशा ठरवण्यात आली.

स्व. शंकरराव चव्हाण यांनी उभारलेल्या पैठण धरणाचा दाखला देत सिंचन सुविधा आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत मांडण्यात आले.

या बैठकीस माजी आमदार संजय वाघचौरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष विनोद तांबे, माजी जिल्हा परिषद सदस्य रवी दादा काळे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तालुकाप्रमुख मनोज पेरे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तसेच अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

– बिडकीनमधील विकासाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर!