छत्रपती संभाजीनगरात ड्रग्सवर मोठी कारवाई! 2000 नशेच्या गोळ्या व 118 सिरप बॉटल्स जप्त; आरोपी अटकेत

छत्रपती संभाजीनगरात ड्रग्सवर मोठी कारवाई! 2000 नशेच्या गोळ्या व 118 सिरप बॉटल्स जप्त; आरोपी अटकेत
छत्रपती संभाजीनगरात ड्रग्सवर मोठी कारवाई! 2000 नशेच्या गोळ्या व 118 सिरप बॉटल्स जप्त; आरोपी अटकेत

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. २४ :- शहरात अवैध अंमली पदार्थांविरोधात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने धडक कारवाई करत तब्बल 2000 नशेच्या गोळ्या आणि 118 कोडीनयुक्त सिरप बॉटल्सचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणात आरोपी सय्यद अझर सय्यद अकबर याला अटक करण्यात आली आहे.

राज्यात ड्रग्स विक्री, वितरण आणि तस्करी रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली. विशेष पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर कृती विभाग कार्यरत आहे.

दि. 21 मार्च रोजी छावणी पोलीस ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईत 9 लाख 39 हजार 827 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यात Nitrazepam (AADPAM-10) च्या 2000 गोळ्या आणि Kaimodin-T या कोडीनयुक्त कफ सिरपच्या 118 बॉटल्सचा समावेश आहे. छापा टाकताना आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता.

त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास करत दि. 23 मार्च रोजी आरोपीला छावणी परिसरातून अटक केली.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना व धाराशिव जिल्ह्यांमध्ये अंमली पदार्थांची तस्करी, विक्री किंवा वाहतूक करणाऱ्यांची माहिती नागरिकांनी पुढे येऊन द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

📞 संपर्क : पोलीस उपअधीक्षक साईनाथ ठोंबरे – 9922928733

📞 पोलीस निरीक्षक गीता बागवडे – 8698256089

माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे.

 “ड्रग्सविरोधातील लढा आता अधिक तीव्र – गुन्हेगारांना कुठेही लपता येणार नाही!”