चिकलठाणा ते एपीआय कॉर्नरदरम्यान ६४५ अतिक्रमणांची हटवणूक; उद्या पैठण रोडवर मोहीम
अतिक्रमणाची कारवाई चालुच राहणार अतिक्रमण विभागाचे नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी सांगितले
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर, २९ जून :प्रशासक जी. श्रीकांत यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांच्या उपस्थितीत आज चिकलठाणा गाव ते एपीआय कॉर्नरदरम्यान मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण विरोधात कारवाई करण्यात आली. या मोहिमेत पक्की आणि कच्ची अशा ६४५ बांधकामांची हटवणूक करण्यात आली असून, यात हॉटेल्स, लॉज, दुकाने, शेड्स, कंपाउंड वॉल, ओटे, गॅरेज, वॉशिंग सेंटर्स, कमानी व जाहिरात फलकांचा समावेश होता.
ही कारवाई राबवण्यासाठी महापालिकेचे ३५० व पोलीस विभागाचे ४०० अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते. यामध्ये २० जेसीबी, ५ पोकलेन, १५ टिप्पर, २ रूग्णवाहिका, २ कोंडवाडा वाहने, २ अग्निशमन बंब व ४ इलेक्ट्रिक हायड्रॉलिक वाहनांचा वापर करण्यात आला.
या कारवाईस नगररचना विभागाचे उपसंचालक श्री. गर्जे, यांत्रिकी विभागाचे अमोल कुलकर्णी, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलीस आयुक्त रणजीत पाटील, अतिक्रमण उपायुक्त सविता सोनवणे, सहाय्यक आयुक्त अर्जुन गिराम, प्राजक्ता वंजारी, अर्चना राजपूत, रमेश मोरे, संजय सुरडकर, समीउल्लाह, भारत बिरारे, राहुल जाधव, नईम अन्सारी, तसेच नगररचना, बांधकाम आणि नागरी मित्र पथकाचे अनेक अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, जालना रोड परिसरात परवानगीशिवाय उभारण्यात आलेल्या महाकाय होर्डिंग प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पैठण रोडवर पुढची मोहीम उद्या!
मुख्य लेखा व वित्त अधिकारी व अतिक्रमण विभागाचे नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी सांगितले की, अशीच कारवाई उद्या ३० जून रोजी पैठण रोड परिसरात करण्यात येणार असून, अतिक्रमणविरोधी मोहीम सातत्याने राबवली जाणार आहे.
अधिकृत आदेशांचे पालन, स्वच्छ शहराची दिशा – वाचत रहा
महाराष्ट्र वाणी.com