केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्यव्यापी धरणे आंदोलन
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २९ :- सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या वतीने NEET पेपर फुटीच्या निषेधार्थ तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान अधोरेखित करण्यात आले.
या आंदोलनादरम्यान NEET पेपर फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री Dharmendra Pradhan यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या हिताच्या विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने सादर करण्यात आले.
यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ते प्रशांत बोराडे, वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद पश्चिम जिल्हाध्यक्ष रुपचंद गडेकर, युवा आघाडीचे पश्चिम शहराध्यक्ष राहुल मकासरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे,” अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.