काँग्रेसकडून इंजि. इफ्तेखार शेख यांची ‘प्रभाग १३’ साठी उमेदवारीची जोरदार तयारी!
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १७ :- महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १३ (कैसर कॉलोनी – अल्तमश कॉलोनी) मधून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या इंजिनियर इफ्तेखार शेख यांनी आज गांधी भवन येथे जाऊन अधिकृत उमेदवारी फॉर्म घेतला. यानंतर त्यांच्या उमेदवारीला गती मिळाली असून स्थानिक पातळीवर या घडामोडीची चर्चा रंगली आहे.
उमेदवारी फॉर्म घेताना काँग्रेसचे MPCC प्रदेश सचिव अॅड. सय्यद अकरम, शहर संघटन महासचिव इंजि. विशाल बन्सवाल यांच्यासह अनेक युवा कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षातील वरिष्ठांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रक्रियेमुळे इफ्तेखार शेख यांची उमेदवारी मजबूत मानली जात आहे.
इफ्तेखार शेख हे तांत्रिक शिक्षण घेतलेले, सामाजिक कार्यात सक्रिय आणि स्थानिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे तरुण नेतृत्व म्हणून ओळखले जातात. कैसर कॉलोनी, अल्तमश कॉलोनी परिसरातील पाणी, रस्ते, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी पुढाकार घेतल्याने त्यांना स्थानिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
महानगरपालिका निवडणूक जवळ आली असताना काँग्रेसने या प्रभागात मजबूत उमेदवार उभा करण्याचे धोरण आखले असून, इफ्तेखार शेख यांनी फॉर्म घेतल्याने प्रभाग १३ मधील राजकीय समीकरणे रंगतदार बनली आहेत.