इकरा थिम महाविद्यालयात राष्ट्रीय रसायनशास्त्र दिन साजरा – डॉ. प्रफुल्ल चंद्र रे यांच्या जयंतीनिमित्त लघुपटाचे आयोजन
महाराष्ट्र वाणी न्युज
जळगाव (प्रतिनिधी) दि ४ ,, ऑगस्ट :– एच. जे. थिम कला व विज्ञान महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय रसायनशास्त्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम महान वैज्ञानिक डॉ. प्रफुल्ल चंद्र रे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमात डॉ. रे यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित लघुपट दाखवण्यात आला. या लघुपटातून विद्यार्थ्यांना त्यांच्या वैज्ञानिक योगदानाबरोबरच राष्ट्रप्रेमाची जाणीवही झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. चाँद खान होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. वकार शेख, डॉ. तन्वीर खान, रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. साजिद मलक, प्रा. डॉ. मुस्ताकीम शरीफ, डॉ. अख्तर शाह, भूगोल विभागाचे डॉ. अमीन काझी, डॉ. इरफान शेख तसेच गणित विभागाचे डॉ. सदाशिव डापके आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन नव्याने रुजू झालेल्या प्रा. झैनब पटेल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल रसायनशास्त्र विभागाचे सर्वत्र अभिनंदन करण्यात आले.
🧪 विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक जाणीव आणि प्रेरणा वाढवणारा हा उपक्रम विशेष कौतुकास पात्र ठरला!