आमदार संजय केनेकर यांच्या प्रयत्नांना यश; म्हाडा वसाहतीतील प्रश्नांवर मंत्रालयात सकारात्मक हालचाल

आमदार संजय केनेकर यांच्या प्रयत्नांना यश; म्हाडा वसाहतीतील प्रश्नांवर मंत्रालयात सकारात्मक हालचाल
आमदार संजय केनेकर यांच्या प्रयत्नांना यश; म्हाडा वसाहतीतील प्रश्नांवर मंत्रालयात सकारात्मक हालचाल

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. २३ :- 

मुंबई येथील मंत्रालय मध्ये छत्रपती संभाजीनगरमधील सिडको एन-७ परिसरातील म्हाडा वसाहतीतील घरधारकांच्या प्रलंबित प्रश्नांवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सविस्तर आढावा बैठक घेतली. ही बैठक आमदार संजय केनेकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पार पडल्याची माहिती समोर आली आहे.

या बैठकीत खरेदी प्रक्रियेदरम्यान मूल्यांकनातील फरकावर आकारण्यात आलेले मुद्रांक शुल्क रद्द करणे, लीज डीडचे नूतनीकरण, मुद्रांक शुल्क व चौपट दंड माफी, १०% विलंब शुल्क रद्द करणे, भूभाडे माफी तसेच रहिवाशांना घरांच्या मालकी हक्काबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

या सर्व मुद्द्यांवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागण्यांना गती मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

आमदार संजय केनेकर यांच्या पाठपुराव्यामुळे हजारो कुटुंबांच्या घरमालकी हक्काचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे दिसत असून, नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.

👉 केनेकरांच्या प्रयत्नांमुळे संभाजीनगरकरांना दिलासा; घरमालकी हक्काचा प्रश्न आता मार्गी लागणार!