“आक्रोश मोर्चात यशस्वी जबाबदारी पार पाडल्याबद्दल विश्वजीत चव्हाणांचा मुंबईत सत्कार”

“आक्रोश मोर्चात यशस्वी जबाबदारी पार पाडल्याबद्दल विश्वजीत चव्हाणांचा मुंबईत सत्कार”
“आक्रोश मोर्चात यशस्वी जबाबदारी पार पाडल्याबद्दल विश्वजीत चव्हाणांचा मुंबईत सत्कार”

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई दि ३० (प्रतिनिधी) :– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या आक्रोश मोर्चात निरीक्षक म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडणारे विश्वजीत चव्हाण यांचा आज मुंबई येथे सत्कार करण्यात आला.

प्रदेश कार्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रांताध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, प्रांत उपाध्यक्ष माजी आमदार सुनीलजी भुसारा, प्रदेश सरचिटणीस रवींद्रजी पवार आणि प्रदेश प्रवक्ता महेश तपासे यांच्या हस्ते चव्हाण यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

मोर्चाचे नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि संघटनात्मक बांधिलकी यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी विश्वजीत चव्हाण यांचे कौतुक केले. या प्रसंगी बोलताना नेत्यांनी सांगितले की, “पक्षाचे आंदोलन आणि मोर्चे हे केवळ आवाज उठवण्याचे नव्हे, तर जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचे प्रभावी साधन आहेत. अशा वेळी जबाबदारी सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांचे योगदान फार महत्त्वाचे असते.”

सत्कार सोहळ्यास उपस्थित कार्यकर्त्यांनीही विश्वजीत चव्हाण यांचे अभिनंदन केले. पक्षातील युवा कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणारा हा गौरव सोहळा ठरला.