ISRO ला भेट दिलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार! रॉकेट ची प्रतिकृती दिली आयुक्तांना भेट
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २७ :- महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत साहेब यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची स्मार्ट स्टुडन्ट एक्झाम घेऊन त्यामधील टॉप टेन विद्यार्थ्यांची निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी नुकतीच विमानाने प्रवास करून तिरुअनंतपुरम केरळ येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटर ISRO या रॉकेट प्रक्षेपण ठिकाणी भेट दिली होती
या भेटीमध्ये तेथील ग्रुप डायरेक्टर माननीय आर हरिकृष्णन यांनी विद्यार्थ्यांसोबत चर्चा करताना तुमची निवड कशी झाली आणि येथे कसे आले असे विचारले असता विद्यार्थ्यांनी आमच्या आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत साहेब यांनी एक mpsc च्या धर्तीवर पूर्व आणि मुख्य परीक्षा विज्ञान या विषयावर घेतली होती आणि त्यामधून आम्हाला Top 11 विद्यार्थी निवडले होते जे की आम्ही तेच आहोत तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा आणि संशोधन वृत्तीचा विकास व्हावा म्हणून आयुक्तांचे हे पाऊल खूप चांगले आहे असे म्हणून आयुक्त तथा प्रशासक महोदय जी श्रीकांत साहेब यांना एक रॉकेट ची प्रतिकृती भेट देण्यासाठी दिली होती
ती प्रतिकृती उप आयुक्त अंकुश पांढरे यांनी आदरणीय आयुक्त तथा प्रशासक यांना सुपूर्द करण्यात आली आणि तेथे सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला
या वेळी अंकुश पांढरे उप आयुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख,गणेश दांडगे नियंत्रण अधिकारी,भारत तिनगोटे शिक्षणाधिकारी, dnyanadeo Sangle कार्यक्रम अधिकारी,अहमद पटेल,सपकाळ सर प्रकाश थोरे ,प्रवीण नरवडे मुख्याध्याप तसेच मनपा के प्रा शाळा नारेगाव, सिडको एन 7,हर्सूल,इंदिरानगर बायजीपुरा, आणि प्रा शाळा विटखेडा व मिटमिटा, शाळेचे विद्यार्थी तसेच किरण तबडे ,मंगेश जाधव, उमा पाटील,सविता बांबर्डे ,सोमनाथ केदार शिक्षक उपस्थित होते