८० विद्यार्थ्यांचे दाखले ‘गहाळ’ – केएसटी उर्दू शाळेवर बंदची कुऱ्हाड? मुख्याध्यापक-चेअरमनवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश; पालकांमध्ये संताप

८० विद्यार्थ्यांचे दाखले ‘गहाळ’ – केएसटी उर्दू शाळेवर बंदची कुऱ्हाड? मुख्याध्यापक-चेअरमनवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश; पालकांमध्ये संताप
८० विद्यार्थ्यांचे दाखले ‘गहाळ’ – केएसटी उर्दू शाळेवर बंदची कुऱ्हाड? मुख्याध्यापक-चेअरमनवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश; पालकांमध्ये संताप

महाराष्ट्र वाणी न्युज 

नशिराबाद (जळगाव)दि २८ जून :– केएसटी उर्दू शाळेत दहावी उत्तीर्ण ८० विद्यार्थ्यांचे ‘शाळा सोडल्याचे दाखले’ अद्यापही न मिळाल्याने पालकांमध्ये संताप उसळला आहे. या गंभीर निष्काळजीपणामुळे शाळेची मान्यता रद्द करण्याची शिफारस शिक्षण समितीने केली असून, तत्कालीन मुख्याध्यापक वसीम कुरेशी आणि शालेय समितीचे चेअरमन शकील कुरेशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेशही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

गंभीर अनियमितता : जनरल रजिस्टर गहाळ

शाळेच्या जनरल रजिस्टरमध्ये विद्यार्थ्यांची माहिती असते, पण ती न सापडणे ही मोठी प्रशासनिक चूक मानली जात आहे. चौकशीदरम्यान मुख्याध्यापक आणि शालेय समितीने सहकार्य न केल्यामुळे हा प्रकार अधिक संशयास्पद बनतो. त्यामुळेच गटशिक्षणाधिकारी सरला पाटील, उपशिक्षणाधिकारी रागिनी चव्हाण व मनपाचे अधिकारी खलील शेख यांनी शाळेची मान्यता रद्द करण्याची जोरदार शिफारस केली आहे.

गुन्हा दाखल करण्याचे आदेश, पण पोलीस ठप्प

२७ जून रोजी पालकांच्या शिष्टमंडळासोबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संवाद साधला आणि दाखले त्वरीत देण्याचे आश्वासन दिले. मात्र संध्याकाळी सहापर्यंतही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला नव्हता. इतकेच नव्हे तर, मुख्याध्यापकाचा चार्ज सुद्धा गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे एकतर्फी पद्धतीने देण्यात आला, असा आरोप पालकांनी केला आहे.

पालकांचा रोष; आता स्वतः तक्रार देणार!

सरकारी अधिकाऱ्यांनी कारवाई टाळल्याचा आरोप करत पालक आता स्वतः पोलीस ठाण्यात तक्रार देणार आहेत. शाळा व शिक्षण विभागातील काहींच्या संगनमताचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

जि. प. कार्यालयाबाहेर शिष्टमंडळाचा आवाज

या प्रकरणात एकता संघटनेचे फारूक शेख, मतीन पटेल, अनीस शाह, युसुफ पठाण यांच्यासह नशिराबादमधील पालक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी जिल्हा परिषदेबाहेर पत्रकारांशी संवाद साधत परिस्थितीची माहिती दिली.

शेवटी एवढंच – विद्यार्थ्यांचे भवितव्य दावणीला लावणाऱ्या व्यवस्थेवर कोण रोष व्यक्त करणार?

– आणखी किती वेळ शिक्षणाच्या मंदिरात गोंधळ माजणार?

ही बातमी तुम्हाला उपयुक्त वाटली का? अशाच बातम्यांसाठी वाचा [महाराष्ट्र वाणी.com]