सिल्लोड तालुक्यात खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय योजनांची आढावा बैठक

सिल्लोड तालुक्यात खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय योजनांची आढावा बैठक
सिल्लोड तालुक्यात खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय योजनांची आढावा बैठक

महाराष्ट्र वाणी न्युज 

सिल्लोड दि ९ :- तालुक्यातील विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी पंचायत समितीच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षस्थानी माननीय खासदार डॉ. कल्याणरावजी काळे साहेब हे होते. बैठकीदरम्यान सर्व शासकीय विभागांतील जनतेच्या प्रलंबित कामांविषयी नागरिकांचे प्रश्न ऐकण्यात आले. नागरिकांनी मांडलेल्या विविध तक्रारी व मागण्यांबाबत माननीय खासदार डॉ. काळे यांनी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना तत्काळ उत्तर देण्यास सांगितले. तसेच सर्व विभागातील जनतेच्या प्रलंबित कामांचे प्रश्न मार्गी लावावेत, अशी स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. डॉ. कल्याणरावजी काळे यांनी पुढे सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या विभागातील चालू आणि प्रलंबित कामांची सविस्तर माहिती देण्याचे निर्देश दिले. त्यांनी शेतकरी, नागरिक, महिला आणि अपंग बांधवांच्या हिताशी संबंधित योजनांची अंमलबजावणी वेगाने करण्यावर भर दिला.

या बैठकीस तहसीलदार सतीश सोनी, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कुमार कोल्हे, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, उपविभागीय अधिकारी आघाव साहेब, सिल्लोड तालुका काँग्रेस अध्यक्ष भास्करराव घायवट पाटील, सिल्लोड शिवसेना तालुकाप्रमुख रघुनाथ घरमोडे, तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप, तालुका पुरवठा अधिकारी बळीराम मुंडे, गट शिक्षणाधिकारी अनिल पवार, आरोग्य विभागातील, राष्ट्रवादी माजी तालुकाध्यक्ष अजित पाटील, अल्पसंख्यांक प्रदेश सचिव कैसर आझाद, जिल्हा सरचिटणीस इकबाल अहमद तसेच नागरिक व विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.