वारकऱ्यांसाठी पुण्यात 'कृष्णाई युवा मंच'कडून सेवा उपक्रम; आमदार मोहन जोशी यांच्या हस्ते वाटप
महाराष्ट्र वाणी न्युज
पुणे प्रतिनिधी – शंकर जोग दि. २१ जून :- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पुण्यात आगमन झाल्यानंतर, हजारो वारकऱ्यांनी पुणे शहरातील मुक्कामी थांब घेतला. या पार्श्वभूमीवर, रास्ता पेठ येथील ‘कृष्णाई युवा मंच’ यांच्यावतीने वारकऱ्यांसाठी विशेष सेवा उपक्रम राबविण्यात आला.
सकाळच्या सत्रात मसाला डोसा, उत्तप्पा, खोबरेल तेलाच्या बाटल्या, स्नानासाठी साबण, तसेच पावसाळी रेनकोट यांचे मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचे उद्घाटन माजी आमदार मा. मोहनदादा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित वारकऱ्यांना त्यांनी शुभेच्छा देत, "पालखी म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि सेवा – आणि ही सेवा म्हणजेच खरी अध्यात्मिक साधना," असे भावनिक उद्गार काढले.
कार्यक्रमाला माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे, अजय बापू भोसले, तसेच 'कृष्णाई युवा मंच'चे अध्यक्ष उदय मोहिते प्रमुख उपस्थित होते. त्यांच्यासह प्रा. वाल्मीक जगताप, वसंत धारवे, पुणे शहर काँग्रेस कमिटी इंटरचे अध्यक्ष चेतन अग्रवाल, बापू खरात, सचिन धिवार, नवीन सिंह, अरुण धारवे, योगेश राऊत, अखिल ठक्कर, अजय मोरे, गणेश दरडीगे, तुषार कांबळे, राजेंद्र राठोड, मनोज नायर, अमर राठोड आदी मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे पुण्यातील सामाजिक आणि धार्मिक सलोखा अधोरेखित झाला असून, वारकऱ्यांनी देखील सेवाभावी उपक्रमाची स्तुती करत आभार व्यक्त केले.