वक्फ सुधारणा, ‘मार्टी’ भरती आणि उर्दू अकादमीला दिलासा – मंत्री भरणे यांचे निर्देश

‘मार्टी’ व आयुक्तालयातील रिक्त पदांची भरती तातडीने करण्याचे मंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

वक्फ सुधारणा, ‘मार्टी’ भरती आणि उर्दू अकादमीला दिलासा – मंत्री भरणे यांचे निर्देश
वक्फ सुधारणा, ‘मार्टी’ भरती आणि उर्दू अकादमीला दिलासा – मंत्री भरणे यांचे निर्देश

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई,( प्रतिनिधी) दि. ९ जुलै –अल्पसंख्याक विभागाअंतर्गत सुरू असलेल्या योजनांचा आढावा आज मंत्रालयात अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या दालनात घेण्यात आला. यावेळी ‘मार्टी’ व आयुक्तालयातील रिक्त पदांची भरती तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीबाबत बोलताना, "अकादमीसाठी पर्यायी जागा उपलब्ध होईपर्यंत सध्याच्या ठिकाणीच कार्यालय सुरू राहील," असे स्पष्ट करत, त्या ठिकाणाची तातडीने डागडुजी करावी, असेही त्यांनी आदेश दिले.

मुंबई फोर्ट येथील अकादमीची जागा ही अल्पसंख्याक विभागाच्या मालकीची असल्याने, नवीन जागेसंदर्भात अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले. उर्दू व मराठी भाषांतील साहित्याचे साम्य अधोरेखित करण्यासाठी जास्तीत जास्त भाषांतराची कामे उर्दू अकादमीमार्फत व्हावीत, असेही त्यांनी सूचित केले.

वक्फ बोर्डाच्या कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर भर देत, सुनावण्यांचे निकाल पोर्टलवर जनतेसाठी उपलब्ध करण्याचेही निर्देश देण्यात आले.

या बैठकीस आमदार अमिन पटेल, रईस शेख, सना मलिक, वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद, अध्यक्ष समीर काझी, उपसचिव मिलिंद शेणॉय, अवर सचिव विशाखा आढाव यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

– विश्वासार्ह बातमीसाठी वाचा महाराष्ट्र वाणी!