मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती ऑनलाईन नोंदणीला सुरुवात
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. १० :– राज्यातील शालेयस्तरावरील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सन 2025 – 26 या वर्षापासून मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना ही महाडीबीटी पोर्टलद्वारे (MAHADBT PORTAL) ऑनलाईन राबविण्यात येत आहे.
योजनेचा तपशील खालीलप्रमाणे
1. इयत्ता 9 वी व 10 वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती
2. साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती (यात सर्व धर्माचा समावेश)
3. इ.5 वी ते 7 वी आणि 8 वी ते 10 वी मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
4. माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती
5. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क शिष्यवृत्ती
शैक्षणिक वर्ष सन 2025 – 26 मध्ये मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचे महाडीबीटी पोर्टलद्वारे (https://permatric.mahait.org/login/login ) या महाडीबीट पोर्टलद्वारे वेब लिंकवर शाळा व विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याची कार्यपद्धती
पहिल्या टप्यात करावयाची कार्यपद्धती
सर्व प्रथम शाळांनी आपले महाडीबीटी पोर्टलद्वारे वर दिलेल्या महाडिबीटी प्रणालीच्या वेब लिंकवर शाळांची नोंदणी (रजिस्टेंशन) करण्यात यावी.
सर्व मुख्यध्यापाक यांनी महाडीबीटी पोर्टलद्वारे (https://permatric.mahait.org/login/login ) वरील आपल्या शाळाचा लाँगीन आयडी व पासवर्ड तयार करण्यात यावा.
दुसरा टप्यात करावयाची कार्यवाही
सदर योजनेचे ऑनालाईन अर्ज सादर करण्याकरीता संबंधित विद्यार्थी अथवा त्यांचे पालकांनी अर्ज भरण्याकरीता आवश्यक कागदपत्रे संबंधित मुख्याध्यापक यांच्याकडे सादर करावेत.
संबंधित मुख्याध्यापक यांनी महाडीबीटी पोर्टलद्वारे ( MAHADBT PORTAL) शाळाच्या लॉगीन आयडीवर आपल्या शाळेतील अनुसूचित जाती विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्यात यावे. (बिना शुल्क)
संबंधित मुख्याध्यापक यांनी महाडीबीटी पोर्टलद्वारे ( MAHADBT PORTAL) वर भरण्यात आलेले ऑनलाईन अर्ज संबंधित (गटशिक्षण अधिकारी सर्व पंचायत समिती व प्रशासन अधिकारी – महानगरपालिका) यांच्या लॉगीनवर सादर करावे.
संबंधित गटशिक्षण अधिकारी – सर्व पंचायत समिती व प्रशासन अधिकारी – महानगरपालिका यांनी त्याच्या स्तवरावर ऑनलाईन अर्जाची तपासणी करुन पात्र व परिपूर्ण अर्ज जिल्हा स्तरावरील समाज कल्याण विभागाच्या लाँगीनवर सादर करावे.
सर्व मुख्याध्यापक यांना महाडीबीटी पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याचे सुरु झाल्याबाबतच्या सूचना देण्यात येतील.
शहरी भागातील महानगरपालिका, अनुदानित खासगी तथा ग्रामीण भागातील जिल्हा परिषद, सर्व अनुदानित खासगी शाळांनी शैक्षणिक वर्षात सन 2023-24 पासून ऑनलाईन शाळांची नोंदणी सुरु असून महाराष्ट्र राज्यात, जिल्ह्यातील शाळांची नोंदणी फार कमी प्रमाणात आहे. शाळांना आवाहन करण्यात येते की लवकरात लवकर (MAHADBT PORTAL) वर ऑनलाईन शाळांची नोंदणी करण्यात यावी. जिल्ह्यातील मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरावेत. कोणताही विद्यार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही यांची दक्षता संबंधित शिक्षक, मुख्याध्यापक, गटशिक्षण अधिकारी व प्रशासन अधिकारी यांनी दक्षता घ्यावी, त्याकरीता विद्यार्थी व पालक यांना प्रोत्साहीत करावे,असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाबासाहेब खरात यांनी केले आहे.