माणुसकीच्या नात्यांचा गोडवा! पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्याकडून धाराशिवमध्ये गरजूंना दिवाळी फराळाचे वाटप

धाराशिव (प्रतिनिधी) डि ८ :- दिवाळीचा आनंद केवळ आपल्या कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता समाजातील गरजू नागरिकांसोबतही तो वाटून घेण्याचा स्तुत्य उपक्रम धाराशिव येथे राबविण्यात आला. पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या उपस्थितीत अन्नपूर्णा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे गरजू नागरिकांना दिवाळीनिमित्त फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार कैलास पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

सणासुदीच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या गरजू नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. फराळ वाटपाच्या माध्यमातून दिवाळीचा गोडवा आणि माणुसकीचा संदेश समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.

गरजूंच्या चेहऱ्यावरील हास्य आणि त्यांच्या मनातील समाधान हेच अशा सामाजिक उपक्रमांचे खरे यश असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. सणांचा आनंद प्रत्येकापर्यंत पोहोचावा, समाजातील परस्परांमधील आपुलकी आणि बंधुभाव अधिक दृढ व्हावा, हाच या उपक्रमामागील मुख्य हेतू होता.

या कार्यक्रमाला नगरसेवक तथा गटनेते खलिफा कुरेशी, नगरसेवक बबलू शेख, इस्माईल शेख, पंकज नाना भोसले, सुनील आंबेकर, एजाज काझी, शेखर घोडके, रोहित बागल, सचिन अंधारे, सूरज वडवले, शुभम सुकाळे, विश्वास भोसले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित