मराठवाड्यातील रेल्वे जाळ्यासाठी खासदार कराडांचा पुढाकार; रेल्वेमंत्र्यांना दिलं नव्या मार्गांचं सविस्तर पत्र

महाराष्ट्र वाणी न्युज 

नवी दिल्ली दि ८ ऑगस्ट :- मराठवाडा व परिसरातील पर्यटन, व्यापार आणि औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी खासदार डॉ. भागवत कराड यांनी आज केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्लीत सौजन्य भेट घेतली. या भेटीत त्यांनी नव्या रेल्वेमार्गांच्या सर्वेक्षण व डीपीआरला तातडीने मान्यता देण्याची मागणी केली.

खासदार कराड यांनी सादर केलेल्या प्रस्तावात पुढील महत्त्वाचे मार्ग सुचविण्यात आले आहेत –

छत्रपती संभाजीनगर – गंगानगर – अहमदनगर (अहिल्यानगर)

बीड – पैठण – बिडकीन – छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर – कन्नड – चाळीसगाव

या मार्गांच्या माध्यमातून अजंठा व वेरूळ यांसारख्या जागतिक वारसा स्थळांना रेल्वेने थेट जोडणी मिळेल, परिणामी पर्यटन क्षेत्राला मोठा लाभ होईल. यासोबतच औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रांतील संधीही विस्तारतील, असा विश्वास खासदार कराड यांनी व्यक्त केला आहे.

🛤️ "मराठवाड्याच्या विकासासाठी ही नवी दिशा ठरणार!"