मनपात ‘बहुजन’ महाशक्तीचा एल्गार! भारतीय समाज आघाडीची घोषणा; ८५ जागा लढवणार

मनपात ‘बहुजन’ महाशक्तीचा एल्गार! भारतीय समाज आघाडीची घोषणा; ८५ जागा लढवणार
मनपात ‘बहुजन’ महाशक्तीचा एल्गार! भारतीय समाज आघाडीची घोषणा; ८५ जागा लढवणार

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)दि २८ :- महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. बहुजन समाजाला एकत्र आणण्याच्या उद्देशाने ‘भारतीय समाज आघाडी’ची अधिकृत घोषणा काल क्रांती चौक येथे करण्यात आली.

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (BRSP), रायभान जाधव विकास आघाडी, ऑल इंडिया पॅंथर सेना (AIPS), पीपीआयडी (PPID), एसडीपीआय (SDPI), डब्ल्यूपीआय (WPI), आंबेडकरी समाज पार्टी (ASP), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPM) आणि समाजवादी पार्टी अशा विविध पक्ष व संघटनांनी एकत्र येत महानगरपालिकेच्या तब्बल ८५ टक्के जागा लढवण्याचा निर्धार यावेळी जाहीर केला.

या धडाकेबाज घोषणेमुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्व वंचित, शोषित, बहुजन घटकांना न्याय देणारा सक्षम पर्याय निर्माण करण्यासाठी ही आघाडी उभारण्यात आली आहे, असे मत यावेळी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाला माजी आमदार हर्षवर्धन जाधव (अध्यक्ष – रायभान जाधव विकास आघाडी), अरविंद कांबळे सर (प्रदेश महासचिव, महाराष्ट्र – BRSP), दीपक भाई केदार (राष्ट्रीय अध्यक्ष – ऑल इंडिया पॅंथर सेना), सय्यद कलीम (SDPI), राजू भाई साबळे (अध्यक्ष – RPM), विजय शिनगारे (जिल्हाध्यक्ष), अनामी मोरे (युवा जिल्हाध्यक्ष) यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

भारतीय समाज आघाडीच्या माध्यमातून महानगरपालिकेत बहुजनांचा सत्तेतील निर्णायक सहभाग वाढवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. येणाऱ्या काळात संयुक्त प्रचार, स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका आणि मजबूत उमेदवार देण्यावर भर दिला जाणार असल्याचे संकेतही नेत्यांनी दिले

महानगरपालिकेच्या राजकारणात बहुजनांची ही एकजूट नवा इतिहास घडवणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे!