प्रभाग क्र.२ मध्ये राष्ट्रवादीचे प्रचार कार्यालय उद्घाटन; आमदार सतीश चव्हाण यांचा नागरिकांशी थेट संवाद

प्रभाग क्र.२ मध्ये राष्ट्रवादीचे प्रचार कार्यालय उद्घाटन; आमदार सतीश चव्हाण यांचा नागरिकांशी थेट संवाद
प्रभाग क्र.२ मध्ये राष्ट्रवादीचे प्रचार कार्यालय उद्घाटन; आमदार सतीश चव्हाण यांचा नागरिकांशी थेट संवाद

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ६ :- महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार चव्हाण यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विकासात्मक धोरणांची माहिती दिली.

या प्रभागातून

अ – श्रीमती सुरेखा सुंदर खरात,

ब – श्री. शेख इरफान शेख अफसर,

क – श्रीमती परवीन पठाण

हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार असून, येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत “घड्याळ” या निशाणीसमोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन आमदार सतीश चव्हाण यांनी केले.

यावेळी बोलताना आमदार चव्हाण म्हणाले की, शहराचा सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्यांचे निराकरण हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रभागातील प्रत्येक घटकाला न्याय देणारे आणि सर्वसमावेशक विकासाचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष श्री. अभिजित देशमुख, श्री. अनुराग शिंदे, श्री. कयुम शेख, श्रीमती वैशालीताई साबळे, श्री. प्रकाश मते यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी उमेदवारांना उत्स्फूर्त पाठिंबा देत प्रचाराला चांगला प्रतिसाद दिला.

शहराच्या विकासासाठी अनुभवी नेतृत्वालाच संधी द्या, असे आवाहन यावेळी नागरिकांना करण्यात आले.