पंचायत समिती कामकाजाचा सखोल आढावा; आमदार अनुराधाताई चव्हाण यांच्या बैठकीत विकासकामांना गती देण्याच्या सूचना

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. २४ :- आमदार अनुराधाताई चव्हाण यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात पंचायत समितीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, प्रलंबित कामे आणि विकासकामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

पंचायत समितीमार्फत राबवण्यात येणाऱ्या घरकुल योजना, रोजगार हमी योजना तसेच इतर विकासकामांची सद्यस्थिती तपासण्यात आली. प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्यावर विशेष भर देत, योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

यावेळी जि.प. अध्यक्ष अविनाश गलांडे, जि.प. उपाध्यक्ष जितेंद्र बाबा जैस्वाल, महिला व बालकल्याण सभापती मीनाक्षीताई पवार, समाज कल्याण सभापती बालाजी सोनटक्के, अर्थ व बांधकाम सभापती सचिन पाटील गरड, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती कल्याण गायकवाड तसेच सर्व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.

“विकासकामांची गती वाढवूनच जनतेचा विश्वास जिंकता येतो!”