देशसेवेचं स्वप्न पाहणाऱ्या युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी; CDS परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण सुरू!

देशसेवेचं स्वप्न पाहणाऱ्या युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी; CDS परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण सुरू!
देशसेवेचं स्वप्न पाहणाऱ्या युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी; CDS परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण सुरू!

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर, दि.२२ :- भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलात अधिकारी म्हणून देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या युवक-युवतींसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) घेतल्या जाणाऱ्या Combined Defence Service (CDS) परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी नाशिक येथे मोफत निवासी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे ३ जून २०२६ रोजी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या वतीने छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड येथे CDS कोर्स क्र. ६७ दिनांक १५ जून २०२६ ते २८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांना निवास, भोजन तसेच प्रशिक्षणाची संपूर्ण सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणासाठी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच UPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या CDS परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज केलेला असणे बंधनकारक आहे. मुलाखतीवेळी संबंधित पात्रता प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक राहणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी ३ जून २०२६ रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. उमेदवारांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) च्या अधिकृत संकेतस्थळावरून CDS-67 कोर्सचे प्रवेशपत्र व संबंधित परिशिष्टे डाउनलोड करून पूर्ण भरून आणावीत. तसेच संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातून प्रिंट देखील उपलब्ध होणार आहे.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.

संपर्क :

📧 training.pctcnashik@gmail.com

☎️ ०२५३-२४५१०३२

📱 व्हॉट्सॲप : ९१५६०७३३०६

देशसेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी युवक-युवतींनी या मोफत सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

“युनिफॉर्मची ओढ आणि देशसेवेची जिद्द असेल, तर ही संधी गमावू नका!”