टप्पा क्र. ३ इमारतीतील लिफ्टचे महापौर समीर राजुरकर यांच्या हस्ते उद्घाटन; नागरिकांसाठी मोठी सुविधा सुरू

टप्पा क्र. ३ इमारतीतील लिफ्टचे महापौर समीर राजुरकर यांच्या हस्ते उद्घाटन; नागरिकांसाठी मोठी सुविधा सुरू
टप्पा क्र. ३ इमारतीतील लिफ्टचे महापौर समीर राजुरकर यांच्या हस्ते उद्घाटन; नागरिकांसाठी मोठी सुविधा सुरू

छत्रपती संभाजीनगर, दि. २३ एप्रिल —

टप्पा क्रमांक ३ इमारतीमध्ये बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक लिफ्टचे उद्घाटन आज सकाळी १० वाजता महापौर समीर राजूरकर यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, सभागृह नेते गोविंद केंद्रे, महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे, अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील व कल्पिता पिंपळे, शहर अभियंता संजय कोम्बडे तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या नव्या लिफ्टमुळे टप्पा क्र. ३ इमारतीत येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि विविध कामांसाठी येणाऱ्या अभ्यागतांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

उद्घाटनानंतर महापौर समीर राजूरकर यांनी लिफ्टचा सुरक्षित वापर व नियमित देखभाल यावर भर देत प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या. तर आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले की, या सुविधेमुळे ‘श्रीमित्र कक्ष’ येथे येणाऱ्या नागरिकांचा जिन्यांचा त्रास लक्षणीय कमी होईल.

यानंतर महापौर, सभापती व आयुक्तांनी दुसऱ्या मजल्यावरील श्रीमित्र कक्ष व कंट्रोल रूमला भेट देत कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी महापौरांनी एका करदात्याशी दूरध्वनीवर संवाद साधून वेळेवर कर भरल्याबद्दल आभार व्यक्त केले.

तसेच, सुमारे १ लाख ६० हजार थकबाकीदार नागरिकांकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना देत त्यांनी वसुली मोहिमेला मार्च महिन्यासारखीच गती देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

👉 “सुविधा वाढली, पण जबाबदारीही वाढली… आता प्रशासनाच्या कार्यक्षमतेची खरी परीक्षा!”