जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी वंचित कार्यालयात उमेदवारांची उस्फूर्त गर्दी

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी वंचित कार्यालयात उमेदवारांची उस्फूर्त गर्दी
जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी वंचित कार्यालयात उमेदवारांची उस्फूर्त गर्दी

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर, दि. १८ :- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या मध्यवर्ती शहर जिल्हा पक्ष कार्यालयात इच्छुक उमेदवारांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. आज (१८ जानेवारी) रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

या मुलाखती वंचित बहुजन आघाडीच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा औरंगाबाद जिल्हा प्रभारी अरुंधतीताई शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहेत. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक निवडून आल्याने पक्षात उत्साहाचे वातावरण आहे.

कालपासून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांच्या मुलाखती सुरू असून, पहिल्याच दिवशी पंचायत समितीचे ३५ तर जिल्हा परिषदेचे २२ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. आज सकाळपासूनच पक्ष कार्यालयात अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत जिल्हा परिषद (जि.प.) साठी ८२ तर पंचायत समिती साठी तब्बल १७० इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती देण्यात आली.

या वेळी औरंगाबाद पश्चिम जिल्हा निरीक्षक योगेश बन, औरंगाबाद पूर्व जिल्हाध्यक्ष रामेश्वर तायडे, पश्चिम जिल्हाध्यक्ष रूपचंद गाडेकर, पश्चिम शहराध्यक्ष पंकज बनसोडे, जिल्हा महासचिव अंजन साळवे, पूर्व जिल्हा महासचिव रामदास वाघमारे, जिल्हा संघटक रवी रत्नपारखे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊराव गवई, प्रवीण जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

— वाढती गर्दी पाहता वंचित बहुजन आघाडी आगामी निवडणुकांसाठी सज्ज असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.