आमदार अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानी हमजा जलील यांची सदिच्छा भेट; ‘IJ फेस्टिव्हल’चे दिले निमंत्रण
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) वि १२ :- छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार तथा एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांचे सुपुत्र हमजा जलील यांनी आज सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी आगामी ‘IJ फेस्टिव्हल’ कार्यक्रमाचे आमंत्रण आमदार अब्दुल सत्तार यांना दिले.
या सदिच्छा भेटीच्या निमित्ताने विविध विषयांवर अनौपचारिक चर्चा झाली. आगामी ‘IJ फेस्टिव्हल’च्या आयोजनासह सामाजिक, सांस्कृतिक आणि इतर महत्त्वाच्या विषयांवरही यावेळी विचारांची देवाणघेवाण झाल्याचे समजते.
दरम्यान, हमजा जलील यांच्या आगमनानिमित्त आमदार अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार आणि जिल्हा परिषद सदस्य अब्दुल आमेर यांच्या हस्ते त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.
राजकीय क्षेत्रातील दोन वेगवेगळ्या प्रवाहांशी संबंधित कुटुंबांतील सदस्यांची ही सदिच्छा भेट चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटीमुळे आगामी ‘IJ फेस्टिव्हल’च्या निमंत्रणालाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
महाराष्ट्र वाणी |
सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित