स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच खासदार सिरजगाव घाटीत — ग्रामस्थ म्हणाले, “हा आमच्या इतिहासातील दिवस!”

. डॉ. काळेंची भेट म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच आहे,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच खासदार सिरजगाव घाटीत — ग्रामस्थ म्हणाले, “हा आमच्या इतिहासातील दिवस!”
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच खासदार सिरजगाव घाटीत — ग्रामस्थ म्हणाले, “हा आमच्या इतिहासातील दिवस!”

महाराष्ट्र वाणी न्युज 

जालना, १२ जुलै :- जालना लोकसभा मतदारसंघातील डोंगराळ आणि दुर्गम सिरजगाव घाटी गावाने दिनांक११ जुलै रोजी ऐतिहासिक क्षण अनुभवला. स्वातंत्र्यानंतर प्रथमच एखाद्या खासदाराने या गावाला भेट दिली. नव्याने निवडून आलेले खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या आगमनाने गावात उत्साहाचे आणि समाधानाचे वातावरण पसरले.

“स्वातंत्र्यानंतर आजवर कोणीही खासदार आमच्या गावात आला नव्हता. डॉ. काळेंची भेट म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच आहे,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. गावात दाखल होताच ग्रामस्थांनी डॉ. काळे यांचे जल्लोषात स्वागत केले.

त्यांनी गावाच्या पायाभूत समस्या जाणून घेतल्या. पाणीटंचाई, खराब रस्ते, अपुरा वीजपुरवठा, शिक्षण व आरोग्य सेवा याबाबत ग्रामस्थांनी थेट त्यांच्याशी संवाद साधला. “कोणाला किती मतं दिलीत, हे विचारायचं नाही... पण आता तुमच्या गावाचा विकास हा माझा प्राधान्यक्रम असेल,” असे ठाम आश्वासन खासदार डॉ कल्याण काळे यांनी दिले.

या ऐतिहासिक भेटीप्रसंगी मा. सभापती अंकुशराव शेळके, भगवान कदम, भानुदास घुगे, पांडुबाबा शेजुळ, रेवणनाथ कुबेर, परमेश्वर देवकर, नेताजी शेजुळ, नारायण शेजुळ, श्रीमंत शेजवळ, देविदास पवार, विश्वनाथ उगले आदी मान्यवर उपस्थित होते.

ग्रामस्थांच्या मते, ही भेट केवळ राजकीय दौरा नव्हता, तर त्यांच्या गावाला दिसू लागलेली आशेची पहिली किरण होती.

 शेवटी एकच अपेक्षा – आता फक्त आश्वासन नव्हे, तर कृतीही पाहू!