शिवछत्रपती नगरातील दूषित पाणीप्रश्नी प्रशासन सतर्क; हर्सूल सारा फिल्टर केंद्राची पाहणी

शिवछत्रपती नगरातील दूषित पाणीप्रश्नी प्रशासन सतर्क; हर्सूल सारा फिल्टर केंद्राची पाहणी
शिवछत्रपती नगरातील दूषित पाणीप्रश्नी प्रशासन सतर्क; हर्सूल सारा फिल्टर केंद्राची पाहणी

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर, दि. २५ : प्रभागातील शिवछत्रपती नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना दूषित पाणीपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. या गंभीर समस्येची तात्काळ दखल घेत नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आज हर्सूल सारा फिल्टर केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी पाणी शुद्धीकरण प्रक्रिया, जलवाहिन्यांची स्थिती तसेच नागरिकांपर्यंत पोहोचणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पाणीपुरवठा मिळावा यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

“जनतेच्या आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. नागरिकांना लवकरच शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून दिला जाईल,” असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

“पाण्याचा प्रश्न म्हणजे थेट जनतेच्या आरोग्याचा प्रश्न; प्रशासनाने आता तातडीने कृती करण्याची गरज आहे.”