वयाच्या 56व्या वर्षी ‘एल.एल.बी’ची स्वप्नपूर्ती; राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष देणार CET परीक्षा!
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ३१ :- “शिकण्याला वयाची मर्यादा नसते,” याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. सिल्लोड तालुक्यातील एक छोट्याश्या गावात बोजगाव येथे राहणारे राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष शेलार हरिदास दगडू (वय 56) हे आता एल.एल.बी. अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी MAH-LL.B. 3 Years CET-2026 परीक्षा देणार आहेत.
1 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत ही परीक्षा होणार असून, त्यासाठी ते छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयात हजर राहणार आहेत. वयाच्या 56व्या वर्षी पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी होण्याचा त्यांचा निर्णय अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
शेलार यांनी सामाजिक व शेतकरी प्रश्नांवर काम करत असताना कायद्याचे ज्ञान अधिक सखोल असावे, या उद्देशाने एल.एल.बी. करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या पावलामुळे युवकांसोबतच मध्यमवयीन व्यक्तींनाही शिक्षणासाठी पुढे येण्याचा नवा आत्मविश्वास मिळत आहे.
आजच्या स्पर्धात्मक युगात सतत शिकत राहणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
“स्वप्नांना वय नसतं… फक्त धाडस लागते!”