“नेहरूनगर म.न.पा. रुग्णालय येथे लॅप्रोस्कोपिक शिबिराचा भव्य शुभारंभ”

“नेहरूनगर म.न.पा. रुग्णालय येथे लॅप्रोस्कोपिक शिबिराचा भव्य शुभारंभ”

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ६ :- महानगरपालिकेचे महापौर मा. श्री. समीर राजूरकर, उपमहापौर मा. श्री. राजेंद्र जंजाळ, विरोधीपक्ष नेता मा. श्री. समीर साजिद, सभापती स्थायी समिती मा. श्री. अनिल मकरिये, सभापती वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती मा. डॉ. श्रीमती सुनिता सोळुंके तसेच मा. आयुक्त श्री. अमोल येडगे यांच्या आदेशानुसार व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या वतीने दि. 06/05/2026 रोजी नेहरूनगर म.न.पा. रुग्णालय येथे लॅप्रोस्कोपिक स्त्री कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन महापौर मा. श्री. समीर राजूरकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी सभापती स्थायी समिती मा. श्री. अनिल मकरिये, सभापती वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती मा. डॉ. श्रीमती सुनिता सोळुंके, मा. अतिरिक्त आयुक्त श्री. रणजीत पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, माननीय नगरसेवक मा.श्री.हाजी शेरखान(गटनेता), श्रीमती. सुमैय्या निसार खान, मा.श्री.वाजेद जागीरदार, श्रीमती. नरगीस सय्यद सलीम, श्रीमती.फरतजहाँ अतिक पालोदकर, डॉ. गोविंद नरवने, डॉ. शिरसाट, डॉ. दवंडे, डॉ. कल्पना राठोड, डॉ.सुरज जाधवर, डॉ.सचिन पालवे, असिस्टंट मॅट्रन श्रीमती मीनल ठोकळ, श्रीमती.सुंनदा साठे, श्री.संतोष तायडे आदी मान्यवर उपस्थित होते. नेहरूनगर रुग्णालयचे सर्व कर्मचारी यांच्या नियोजनबद्द कार्यामुळे शिबिर यशस्वीपणे पार पडण्यात आले .

या शिबिरामध्ये 12 महिलांवर यशस्वीपणे मोफत लॅप्रोस्कोपिक स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आत्तापर्यंत महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये आयोजित मोफत लॅप्रोस्कोपिक शिबिरांच्या माध्यमातून एकूण 269 महिलांवर शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत.

मोफत लॅप्रोस्कोपिक (दुर्बिणीद्वारे) कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया या आधुनिक, सुरक्षित व अल्पकालीन विश्रांतीची आवश्यकता असलेल्या पद्धती असून महिलांसाठी वेदनामुक्त व जलद आरोग्यलाभ देणाऱ्या ठरत आहेत. या शस्त्रक्रियांमुळे महिलांच्या आरोग्याबरोबरच कुटुंबाच्या आर्थिक व सामाजिक स्थैर्यालाही बळकटी मिळत आहे.

यापुढेही मनपाच्या सहा रुग्णालयांमधून (सिडको एन-8, सिडको एन-11, सिल्क मिल कॉलनी, कैसर कॉलनी, नेहरूनगर, मेल्ट्रॉन रुग्णालय) नियमितपणे लॅप्रोस्कोपिक स्त्री कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिका छत्रपती संभाजीनगरतर्फे करण्यात येत आहे.