दिशा समितीच्या बैठकीत खासदार डॉ. कल्याण काळे यांचा प्रशासनावर कडक इशारा; “कामात विलंब व भेदभाव सहन केला जाणार नाही!”

दिशा समितीच्या बैठकीत खासदार डॉ. कल्याण काळे यांचा प्रशासनावर कडक इशारा; “कामात विलंब व भेदभाव सहन केला जाणार नाही!”
दिशा समितीच्या बैठकीत खासदार डॉ. कल्याण काळे यांचा प्रशासनावर कडक इशारा; “कामात विलंब व भेदभाव सहन केला जाणार नाही!”

महाराष्ट्र वाणी 🗞️

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ३ :- दिशा समितीची महत्त्वाची बैठक जिल्हा अध्यक्ष खासदार संदीपान भुमरे व सहअध्यक्ष खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटींवर डॉ. काळे यांनी प्रशासनाला चांगलेच सुनावले आणि तत्काळ कारवाईचे आदेश दिले.

बैठकीत मनरेगा गैरव्यवहार प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले, तर आरडीएसएस (RDSS) योजनेतील त्रुटींवर महावितरणला फटकारे देत तात्काळ चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच निकृष्ट कामे, निधी वापरातील तफावती आणि अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबद्दल उघड निषेध नोंदवण्यात आला.

खासदार काळे यांनी सर्व विभागांना कालबद्ध कृती आराखडा व Action Taken Report सादर करण्याचे आदेश देत स्पष्ट केले की, “निधी उपलब्ध असूनही कामांत विलंब, निकृष्ट गुणवत्ता व लाभार्थ्यांमध्ये भेदभाव स्वीकारार्ह नाही.”

बैठकीत पीएमजीएसवाय, पीएमएवाय (शहरी), जल जीवन मिशन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि मनरेगा योजनांतील उणिवा, विलंब व अनियमिततेबाबत प्रश्न विचारण्यात आले. फुलंब्रीतील मनरेगा घोटाळ्याप्रकरणी दोषींवर कारवाई व गुन्हे नोंदवण्याचे निर्देश खासदार काळे यांनी दिले.

बैठकीचा शेवट पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि ठोस समयमर्यादेवर भर देत करण्यात आला. प्रत्येक विभागाने आता नियमित Action Taken Report सादर करणे बंधनकारक राहणार आहे.

🔹 पुढील दिशा:

योजनांमध्ये पारदर्शकता व उत्तरदायित्व वाढवणे

सर्व कामांसाठी ठोस समयमर्यादा ठरवणे

दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कठोर कार्यवाही

प्रत्येक बैठकीत प्रगती अहवाल व कृती आराखडा सादर करणे

जनतेचा निधी जनतेसाठीच — दुर्लक्ष करणाऱ्यांना आता शिक्षा अनिवार्य!