शेतकऱ्याच्या मुलीची MPSC मध्ये झेप; बीडच्या मुस्कानची ‘कर सहाय्यक’ पदावर दमदार निवड
महाराष्ट्र वाणी
बीड ( प्रतिनिधी) दि १८ :- जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील भाळवणी गावातील मुस्कान जहांगिर शेख हिने मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मोठे यश संपादन करत MPSC परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मुस्कानची ‘कर सहाय्यक’ (Tax Assistant) पदावर निवड झाली असून EWS प्रवर्गातून तिने राज्यात १५वा क्रमांक पटकावला आहे.
शेतकरी कुटुंबातील मुस्कानने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. मर्यादित साधनसामग्री, संघर्षमय परिस्थिती आणि अनेक अडचणी असतानाही तिने अभ्यासातील सातत्य कायम ठेवत हे यश मिळवले. तिच्या या यशामुळे कुटुंबासह संपूर्ण भाळवणी गाव आणि बीड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुस्कानच्या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून “जिद्द आणि मेहनत असेल तर कोणतेही स्वप्न अशक्य नाही,” हे तिने सिद्ध करून दाखवले आहे. तिच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून अनेक तरुण-तरुणींसाठी ती प्रेरणास्थान ठरत आहे.
“स्वप्न मोठं असेल, तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी यशाचा मार्ग नक्की सापडतो!”