शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे संविधान दिन उत्साहात साजरा

शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे संविधान दिन उत्साहात साजरा
शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे संविधान दिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २६ :- शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संविधान मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त करत आयोजित या कार्यक्रमात राष्ट्रनिर्मितीतील संविधानाची भूमिका, लोकशाहीची पायाभरणी आणि स्वतंत्र भारताच्या प्रगतीतील असलेल्या योगदानावर विशेष भर देण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करून झाली. भारतीय संविधान हे सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता यांचे संरक्षण करणारे जीवनदायी दस्तऐवज आहे. या मूल्यांचे रक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असे मत शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रीय एकता, सामाजिक सौहार्द आणि लोकशाही बळकटीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येत सामूहिक प्रतिज्ञा घेतली.

या प्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ, ज्येष्ठ नेते इब्राहिम पठाण, छावणी ब्लॉक अध्यक्ष उमाकांत खोतकर, अ.जा. विभाग शहर अध्यक्ष व आयोजक योगेश थोरात, संघटन महासचिव इंजि. विशाल बन्सवाल, डॉ. निलेश आंबेवाडीकर, मोहम्मद जाकिर, जयपाल दवने, उत्तम दनके, इमरान शेख, सुनील साळवे, इरफान पठाण, विजय प्रधान, यादव अहिरे, रवि लोखंडे, मयूर गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

🔺 लोकशाही बळकट ठेवण्याची नवी शपथ…