महागाई, इंधनटंचाईविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन; सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. २१ :- “जनता त्रस्त... सरकार मस्त!” अशा घोषणांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. महागाई, इंधनटंचाई आणि सरकारच्या निष्क्रिय धोरणांविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.
यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
“झोपा काढा झोपा काढा मोदी सरकार झोपा काढा...!”,
“झोपलेल्या सरकारचं करायचं काय? खाली डोके वर पाय...!”,
“निष्क्रिय सरकार हटाव, देश बचाव...!”,
“बहुत हुई महंगाई की मार, भगावो मोदी सरकार...!”
अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.
सरकार पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमधून जनतेची आर्थिक लूट करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
या आंदोलनात शहर जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप, शहर कार्याध्यक्ष फारुख शेख, अश्फाक खान, आनंद खोडके, सुभाष जाधव, लतीफ कुरेशी, शाहरुख मोहम्मद, तारेख पठाण, अतिश खरात, सय्यद जुनेद, मुशू पठाण, इरफान पठाण, अंकुश जाधव, निखिल छाजेड, रविराज बोचरे, मोमीन शेख, शब्बू शेख, सुहास उगले, पांडुरंग काळे, नवनाथ बिडवे, संतोष पाटील, बाबासाहेब राठोड, बिजून राऊत, शेहबाज शेख, मनोज घोरपडे, अनिल पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
“महागाईच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेल्या विरोधकांनी सरकारला थेट लक्ष्य करत जनतेच्या प्रश्नांवर उत्तर देण्याची मागणी केली.”