मनपा शिक्षण विभागात मोठे फेरबदल; संजीव सोनार प्रशासन अधिकारीपदी, कोल्हे-रईसा खान यांच्याकडे नवी जबाबदारी

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.१९ : महानगरपालिका शिक्षण विभागात महत्त्वाचे प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून प्रियदर्शनी शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक संजीव सोनार यांच्याकडे प्रशासन अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

मा. आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार हे बदल करण्यात आले. तसेच केंद्रीय प्राथमिक शाळा बेगमपुरा येथील मुख्याध्यापक विजय कोल्हे यांच्याकडे शिक्षण विस्तार अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. यासोबतच केंद्रीय शाळा किराडपुरा क्र.१ च्या मुख्याध्यापिका रईसा बेगम अयुब खान यांच्याकडेही शिक्षण विस्तार अधिकारी पदाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

या नियुक्तीनंतर आज अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, उपआयुक्त अंकुश पांढरे, शिक्षणाधिकारी भारत तीनगोटे तसेच कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे यांनी तिन्ही अधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

मनपा शिक्षण विभागातील या बदलांमुळे प्रशासन आणि शैक्षणिक कामकाजाला अधिक गती मिळणार असल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात सुरू आहे.

“नवी जबाबदारी, नवा विश्वास… मनपा शिक्षण विभागाच्या कामकाजाला आता मिळणार नवी दिशा!”