बेवारस वाहनांच्या मालकांनी कागदपत्रांसह हर्सूल पोलीस ठाण्यात संपर्क साधावा

बेवारस वाहनांच्या मालकांनी कागदपत्रांसह हर्सूल पोलीस ठाण्यात संपर्क साधावा
बेवारस वाहनांच्या मालकांनी कागदपत्रांसह हर्सूल पोलीस ठाण्यात संपर्क साधावा

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २५ :- हर्सूल पोलीस ठाणे यांच्या हद्दीत विविध कारवायांदरम्यान जप्त करण्यात आलेली तसेच बेवारस स्थितीत आढळून आलेली दुचाकी व चारचाकी वाहने सध्या पोलीस ठाण्याच्या आवारात जमा करण्यात आली आहेत. या वाहनांची कायदेशीर प्रक्रियेनुसार विल्हेवाट लावण्यापूर्वी त्यांच्या मूळ मालकांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

ज्या नागरिकांचा या वाहनांवर मालकी हक्क आहे, त्यांनी वाहनांची मूळ कागदपत्रे घेऊन पुढील ७ दिवसांच्या आत हर्सूल पोलीस स्टेशन येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून आपला मालकी हक्क सिद्ध करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षकांनी केले आहे.

पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, निर्धारित मुदतीत कोणीही मालकी हक्क सिद्ध न केल्यास संबंधित बेवारस वाहने शासकीय नियमांनुसार लिलाव किंवा विल्हेवाट प्रक्रियेत टाकण्यात येतील. त्यानंतर कोणत्याही दाव्याचा विचार केला जाणार नाही.

तसेच ज्या नागरिकांची वाहने चोरीला गेली आहेत किंवा हरवली आहेत, त्यांनी हर्सूल पोलीस विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या वाहनांच्या यादीची पडताळणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी Psharsool.abad@mahapolice.gov.in या अधिकृत ई-मेलवर संपर्क साधावा.

जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये ३० हून अधिक वाहनांचा समावेश असून त्यापैकी काही वाहनांची माहिती पुढीलप्रमाणे आहे :

होंडा पॅशन (लाल रंग) – MH-20-CN-4432

हिरो होंडा स्प्लेंडर प्लस – MH-23-M-3619

पॅशन प्रो (लाल रंग) – नंबर उपलब्ध नाही

हिरो होंडा प्लस (काळा रंग) – MH-20-AW-2269

बजाज प्लॅटिना – MH-20-BC-8410

बजाज डिस्कव्हर – MH-14-DW-9065

बजाज XCD (लाल रंग) – MH-21-W-6109

ह्युंदाई कार (हिरवट रंग) – MH-04-AS-5850

लोडिंग रिक्षा (पांढरा रंग) – MH-23-3047

यामाहा (काळा रंग) – MH-28-P-1375

बजाज कावासाकी कॅलिबर – MH-14-N-1846

बजाज चेतक स्कूटर – MVF-5137

टीव्हीएस स्टार सिटी – MH-20-BE-6442

पॅशन प्रो – MH-12-JV-6202

यासह अन्य वाहनेही हर्सूल पोलीस ठाण्यात ठेवण्यात आली असून संबंधित वाहनमालकांनी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

“तुमचे वाहन हरवले असेल तर एकदा यादी नक्की तपासा; कदाचित तुमची गाडी हर्सूल पोलिसांकडे सुरक्षित असेल!”