जिल्हा रुग्णालयात व्हिटीओरेटिनल सर्जनची आवश्यकता; पात्र नेत्रतज्ज्ञांकडून अर्ज मागविले

प्रति शस्त्रक्रिया १० हजार रुपये मानधन; ६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

जिल्हा रुग्णालयात व्हिटीओरेटिनल सर्जनची आवश्यकता; पात्र नेत्रतज्ज्ञांकडून अर्ज मागविले

छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद दि ३१ :- राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा रुग्णालयात व्हिटीओरेटिनल (Vitreo-Retinal) सर्जनची आवश्यकता असून, या पदासाठी पात्र व इच्छुक नेत्रतज्ज्ञ डॉक्टरांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता एम.एस./डीएनबी (नेत्ररोगशास्त्र) असणे आवश्यक आहे. तसेच व्हिटीओरेटिनल शस्त्रक्रिया करण्याचे आवश्यक कौशल्य आणि अनुभव असणे बंधनकारक आहे. निवड झालेल्या तज्ज्ञ डॉक्टरांसोबत जिल्हा रुग्णालय प्रशासनामार्फत सामंजस्य करार (MOU) करण्यात येणार आहे.

या सेवेसाठी संबंधित डॉक्टरांना प्रत्येक शस्त्रक्रियेमागे प्रति रुग्ण १० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.

इच्छुक व पात्र नेत्रतज्ज्ञांनी आपली शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे, मागील तीन वर्षांचे अनुभव प्रमाणपत्र आणि १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरसह आवश्यक कागदपत्रे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथे ६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत सादर करावीत.

पात्र डॉक्टरांनी विहित मुदतीत अर्ज व आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित