जिन्सी पोलिस स्टेशन ताब्यातील बेवारस दुचाकी वाहन घेऊन जाण्याचे आवाहन

जिन्सी पोलिस स्टेशन ताब्यातील बेवारस दुचाकी वाहन  घेऊन जाण्याचे आवाहन
जिन्सी पोलिस स्टेशन ताब्यातील बेवारस दुचाकी वाहन  घेऊन जाण्याचे आवाहन

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.११ :- जिन्सी पोलिस स्टेशनच्या आवारात अनेक दिवसांपासून ५२ बेवारस दुचाकी वाहने उभी आहेत. पावसामुळे ही वाहने उघड्यावर असल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात पडझड होत असून, ती गंजू लागली आहेत. या वाहनांची पोलिस दप्तरी 'बेवारस' म्हणून नोंद करण्यात आली आहे.

या वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी जिन्सी पोलिसांनी संबंधित मूळ मालकांचा त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु अनेक मालक मिळून आले नाहीत. 

जिन्सी पोलिसांनी संबंधित वाहन असणारे यांनी आपल्या वाहनांची खातरजमा करून आवश्यक कायदेशीर कागदपत्रांसह पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. आपली वाहने घेऊन जावीत.

 MH२०-NQ-९०८८ होंडा ॲक्टीव्हा पांढरा रंग , ०२-BK-६२७१ यामाहा FZ नारंगी रंग,

Mh २०-AX- बजाज अव्हेंजर 

MH-२०-V-६९२ बजाज स्कूटर , हिरवट काळा , MVG-२१०४ ,TVS SUZUKI ,२०-BB होंडा ॲक्टीव्हा ,MH-१९-AH-हिरो होंडा स्प्लेंडर काळा-निळा पट्टा 

MH २८-G-८११९ हिरो होंडा स्प्लेंडर ,काळा-भगवा पट्टा 

 MH-१७-Q-४८१० यामाहा CRUX , नारंगी MH-२०-AZ-३६२५हिरो होंडा CD DELUX सिल्व्हर 

MH २८K-६०५ TVS काळा रंग 

MH-२०-AD-६१९९ हिरो होंडा स्प्लेंडर , काळा-भगवा पट्टा ,

 MH २०-AK-१८१३ TVS VICTOR काळा रंग 

या वाहनांव्यतिरिक्त अन्य वाहनेही पोलिस ठाण्यात जमा आहेत.

संबंधित वाहन मालकांनी योग्य त्या पुराव्यांसह आणि कागदपत्रांसह जिन्सी पोलिस स्टेशनमध्ये येऊन आपल्या वाहनांची ओळख पटवून ती हस्तगत करावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.