गुंठेवारी विकास नियमितीकरणासाठी अभय योजना जाहीर

गुंठेवारी विकास नियमितीकरणासाठी अभय योजना जाहीर
गुंठेवारी विकास नियमितीकरणासाठी अभय योजना जाहीर

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि.६ :- छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (CMRDA) गुंठेवारी विकास नियमितीकरणासाठी नागरिकांना मोठा दिलासा देणारी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेद्वारे नागरिकांना कमी दरात बेटरमेंट चार्जेस भरून आपला विकास नियमित करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे

प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, दि. 01 मे 2026 ते 31 जुलै 2026 या कालावधीत बेटरमेंट चार्जेसवर फक्त 10 टक्के शुल्क आकारले जाणार आहे. त्यानंतर दि. 01 ऑगस्ट 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत 50 टक्के शुल्क आकारण्यात येईल. दि. 01 नोव्हेंबर 2026 पासून मात्र पूर्ण शुल्क आकारले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजी नगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील नागरिकांनी या अभय योजनेचा लाभ घेऊन गुंठेवारी विकास नियमित करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

उप महानगर नियोजनकार यांच्या स्वाक्षरीने हा आदेश जारी करण्यात आला आहे.