उपशिक्षण संचालक कार्यालय, संभाजीनगर येथे सहाय्यक उपशिक्षण संचालकपदी सुनील पोलस यांची नियुक्ती; AMMESTO तर्फे सत्कार करून शुभेच्छा
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) वि १ :- उपशिक्षण संचालक कार्यालय, संभाजीनगर (औरंगाबाद) येथे सहाय्यक उपशिक्षण संचालक (असिस्टंट डेप्युटी डायरेक्टर) पदावर श्री. सुनील पोलस यांची नियुक्ती झाल्याबद्दल ऑल महाराष्ट्र मायनॉरिटी एज्युकेशन सोसायटी अँड टीचर्स ऑर्गनायझेशन (AMMESTO)च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
एएमएमईएसटीओचे राज्याध्यक्ष मुकीम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात श्री. सुनील पोलस यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांच्या नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी त्यांच्या कार्यकाळात सकारात्मक उपक्रम राबविले जातील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
या प्रसंगी उर्दू शिक्षक संघटनेचे मोईनुद्दीन सर, एएमएमईएसटीओचे जिल्हाध्यक्ष अब्दुल रफीक, भारतीय शिक्षक संघटनेचे अझहरुद्दीन सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाला उपशिक्षण संचालक कैलास दातखिड सर यांनीही उपस्थिती लावली. उपस्थित मान्यवरांनी श्री. सुनील पोलस यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
या सत्कार समारंभामुळे शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, शिक्षक आणि विविध संघटनांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, श्री. सुनील पोलस यांच्या नियुक्तीमुळे शिक्षण विभागाच्या कामकाजाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.