रामनवमीपूर्वी महानगरपालिकेचा धडाका! रोशन गेट ते आजाद चौक अतिक्रमण जमीनदोस्त 🚜

रामनवमीपूर्वी महानगरपालिकेचा धडाका! रोशन गेट ते आजाद चौक अतिक्रमण जमीनदोस्त 🚜
रामनवमीपूर्वी महानगरपालिकेचा धडाका! रोशन गेट ते आजाद चौक अतिक्रमण जमीनदोस्त 🚜

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि. २५ :- रामनवमीच्या पार्श्वभूमीवर शहरात सुव्यवस्था राखण्यासाठी महानगरपालिकेने मोठी कारवाई करत रोशन गेट, शरीफ कॉलनी, किराडपुरा राम मंदिर रोड ते आजाद चौक या मार्गावरील अतिक्रमणांवर दिनाां 24 माार्च  रोजी बलडोझर चालवला. अतिक्रमण हटाव पथकाने एकूण 32 अतिक्रमणधारकांवर कारवाई करत संपूर्ण परिसर मोकळा केला.

दि. २६ मार्च रोजी होणाऱ्या रामनवमी उत्सवात भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये, अपघात टळावेत आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली.

कारवाईदरम्यान अनेकांनी रस्त्यावर उभारलेली मोठी शेड, दुकाने आणि अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली. प्रशासनाने पूर्वसूचना देऊनही सहकार्य न करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध जेसीबीच्या साहाय्याने कठोर कारवाई करण्यात आली. यामध्ये लोखंडी टपऱ्या, तीन पत्राचे शेड, तसेच भाजी व नानखलिया बनवण्यासाठी उभारलेल्या भट्ट्यांचा समावेश होता.

याशिवाय, रस्त्यावर टाकलेले वाळू, सिमेंट, विटा यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 10 बेवारस चारचाकी वाहने टोइंग करून गरवारे क्रीडा संकुलात जमा करण्यात आली, तर रिक्षा सोडून गेलेल्या चालकांवरही प्रत्येकी 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

उघड्यावर सुरू असलेल्या चिकन विक्रीवरही कारवाई करत शेड हटवून साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणाचा अहवाल संबंधित विभागाकडे पाठवण्यात आला आहे.

ही संपूर्ण कारवाई आयुक्त जी. श्रीकांत यांच्या आदेशानुसार आणि अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस प्रशासन व महानगरपालिकेच्या विविध अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली.

 रामनवमीपूर्वी प्रशासनाचा इशारा स्पष्ट — नियम मोडाल, तर कारवाई अटळ!