छत्रपती संभाजीनगर पोलीस दलात पदोन्नतीची लाट – 15 हवालदार झाले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक!

छत्रपती संभाजीनगर पोलीस दलात पदोन्नतीची लाट – 15 हवालदार झाले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक!
छत्रपती संभाजीनगर पोलीस दलात पदोन्नतीची लाट – 15 हवालदार झाले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक!

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ७ :- पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील 15 पोलीस हवालदारांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. सेवाज्येष्ठतेच्या आधारावर ही पदोन्नती देण्यात आली असून, संबंधित आदेश जारी करण्यात आले आहेत.

शासनाच्या विविध निर्णयांनुसार आणि अधिसूचनांच्या पालनातून ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. पदोन्नती मिळालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना वेतन मॅट्रिक्स स्तर एस-10 (₹29,200 ते ₹92,300) लागू होणार आहे.

या पदोन्नतीमध्ये शिवाजी गाडे, तक्ष्मकांत बनसोड, समाधान सुरडकर, रमेश तांबोरे, शहादेव पालवे, विष्णु लिपाने, रामधन उटाडे, गणेश डोख, कारभारी बड़े, लक्ष्मण गाढेढेकर, अशोक निमोने, बबन शिंदे, प्रकाश भालेराव, भगवान सिलोटे आणि आसाराम साबळे यांचा समावेश आहे.

दरम्यान, या सर्व पदोन्नत्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असून त्या उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहणार आहेत, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

 पोलीस दलातील मेहनतीला मिळालेले हे बक्षीस; पुढील कामगिरीकडे आता सर्वांचे लक्ष!