इकरा एच. जे. थीम महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात; महिला प्राध्यापिकांचा सत्कार

इकरा एच. जे. थीम महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात; महिला प्राध्यापिकांचा सत्कार
इकरा एच. जे. थीम महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात; महिला प्राध्यापिकांचा सत्कार

महाराष्ट्र वाणी 

जळगाव(प्रतीनीधी) दि ९ :- येथील इकरा एच. जे. थीम आर्ट्स अँड सायन्स महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि युवती सभा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. शेख वकार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. तन्वीर खान यांनी केले. यावेळी डॉ. चांद खान, डॉ. इरफान शेख, डॉ. राजू गवरे, डॉ. शेख हाफीज यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

— महिला सन्मानाचा संदेश देत महाविद्यालय परिसरात ‘महिला दिन’ प्रेरणादायी वातावरणात साजरा झाला.