NHRC अध्यक्षांची औरंगाबाद हिमरू फॅक्टरीला भेट; पारंपरिक कलेचे कौतुक
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २८ :- National Human Rights Commission (NHRC) चे अध्यक्ष तथा विशेष प्रतिनिधी Mohammed Jamshed यांनी छत्रपती संभाजीनगर येथील हिमरू फॅक्टरीला भेट देत पारंपरिक कलेचा जवळून आढावा घेतला. यावेळी त्यांच्या सोबत श्रीमती फरहत जमशेद यांच्यासह प्रतिनिधीमंडळ उपस्थित होते.
फॅक्टरीत आगमन होताच व्यवस्थापकीय संचालक Imran Ahmed Qureshi आणि Aamer Ahmed Qureshi यांनी त्यांचे स्वागत केले.
या भेटीदरम्यान मोहम्मद जमशेद यांनी हिमरू वस्त्रनिर्मितीची पारंपरिक हातमागावरील प्रक्रिया प्रत्यक्ष पाहिली. शतकानुशतके चालत आलेली ही दुर्मिळ कला आजही मूळ स्वरूपात जतन केली जात असल्याचे पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच कारागिरांच्या कौशल्याचे आणि त्यांच्या समर्पणाचे कौतुक करत ही ऐतिहासिक परंपरा पुढील पिढ्यांसाठी जपण्याची गरज अधोरेखित केली.
ही भेट हिमरू टीमसाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी ठरली असून, या कलेच्या जतनासाठी नवे बळ मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
“परंपरेचा वारसा जपला तरच संस्कृती टिकते; हिमरू कलेला अशीच नवी ओळख मिळत राहो!”