महापालिकेची मोठी कारवाई: एमआयटी कॉलेज ते महानुभाव चौकदरम्यान ६४ अतिक्रमणांवर हातोडा

महापालिकेची मोठी कारवाई: एमआयटी कॉलेज ते महानुभाव चौकदरम्यान ६४ अतिक्रमणांवर हातोडा
महापालिकेची मोठी कारवाई: एमआयटी कॉलेज ते महानुभाव चौकदरम्यान ६४ अतिक्रमणांवर हातोडा

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), ५ जून :- महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या आदेशावरून आणि अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष वाहूळे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयटी कॉलेज ते महानुभाव चौक (दक्षिण बाजू) दरम्यान आज जोरदार अतिक्रमणविरोधी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत तब्बल ६४ अतिक्रमणे हटवण्यात आली.

या कारवाईदरम्यान दुकाने, कंपाउंड भिंती, ओटे, टपऱ्या, शेड्स आणि मोठमोठे बॅनर्स निष्कासित करण्यात आले. जप्त केलेल्या मालासह ४५ हजार रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला.

कारवाई दरम्यान सहाय्यक आयुक्त सविता सोनवणे, अर्चना राजपूत, नगररचना अभियंते शिवाजी लोखंडे, सचिन कुमावत, इमारत निरीक्षक आश्विनी कोथळकर, नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव, तसेच जेसीबी व टिप्पर चालक व इतर संबंधित कर्मचारी उपस्थित होते.

20x20 फूटचे अवैध महाहोर्डिंग जमीनदोस्त

मोहीमेतील सर्वाधिक लक्षवेधी घटक ठरला तो २० फूट बाय २० फूटचा अनधिकृत होर्डिंग, जो सर्व्हिस रोडवर लावण्यात आला होता आणि वाहतुकीस मोठा अडथळा ठरत होता. हा महाकाय होर्डिंग आज हटवण्यात आला असून, त्यातून सुमारे ३.५ टन लोखंड जप्त करण्यात आले आहे.

संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून महापालिकेचा अतिक्रमणविरोधी पवित्रा अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे.