छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई! 2.47 किलो MD ड्रग्ससह 3 तस्कर गजाआड; 1.43 कोटींचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई! 2.47 किलो MD ड्रग्ससह 3 तस्कर गजाआड; 1.43 कोटींचा मुद्देमाल जप्त
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई! 2.47 किलो MD ड्रग्ससह 3 तस्कर गजाआड; 1.43 कोटींचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर, दि. २४ जून :– शहरात अंमलीपदार्थाच्या वाढत्या साखळीला छेद देत अंमलीपदार्थ प्रतिबंधक पथकाने मोठी आणि प्रभावी कारवाई केली आहे. या कारवाईत 2 किलो 473 ग्रॅम MD/मेफेड्रॉन पावडर तसेच दोन आयशर टेम्पो असा एकूण 1 कोटी 43 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर एम वाळूज पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुप्त माहितीवरून सापळा रचला, वाहनातून आढळले संशयित रसायन

दिनांक 21 जून 2025 रोजी अंमलीपदार्थ प्रतिबंधक पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे साजापुर गाव ते चौफुली दरम्यान पहाटे 7.45 वाजता सापळा रचण्यात आला. या दरम्यान MH04BU5160 व MH04EY9977 या क्रमांकाच्या दोन आयशर गाड्यांना थांबवून तपासणी करण्यात आली. वाहनांमध्ये स्क्रॅपच्या आड पांढऱ्या रंगाची रसायन सदृष्य पावडर व द्रव पदार्थ आढळून आला.

गोडाऊनवरही छापा, आणखी मेफेड्रॉनचा साठा जप्त

यानंतर, 23 जून रोजी गुप्त माहितीनुसार साजापुर येथील बबन खान यांच्या गोडाऊनवर छापा टाकण्यात आला. त्या ठिकाणीही स्क्रॅपच्या सामानामध्ये मोठ्या प्रमाणात पांढऱ्या रंगाची पावडर सदृष्य रसायन आढळून आले. शासकीय ड्रग्ज किटद्वारे तपासणीअंती हे MD/मेफेड्रॉन असल्याचे स्पष्ट झाले.

आरोपींची नावे व गुन्हा

या प्रकरणात खालील तिघांविरुद्ध एम वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा नं. 616/2025, कलम 21-क, 22-क, 8-क, 25, 29 NDPS Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे:

1. सफीकुर रहेमान तफज्जुल हुसेन (वय 45) – रा. जिल्हा सिध्दार्थनगर, उत्तर प्रदेश

2. राज रामतिरथ अजुरे (वय 38) – रा. जिल्हा सिध्दार्थनगर, उत्तर प्रदेश

3. बबन खान – रा. साजापुर, छत्रपती संभाजीनगर

कारवाईत कुणाचे नेतृत्व व सहभाग?

या धडाकेबाज कारवाईचे मार्गदर्शन मा. पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) प्रशांत स्वामी, सहाय्यक पोलीस आयुक्त सुभाष भुजंग यांनी केले.

पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि मनोज शिंदे, पोउपनि अमोल म्हस्के व इतर अधिकारी व अंमलीपदार्थ प्रतिबंधक पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

पोलिसांचे आवाहन:

शहरातील नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, जेणेकरून नशेच्या विळख्यात अडकणाऱ्या तरुण पिढीला वाचवता येईल, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.