राजकीय संघटनात नवी घडी : राजेश पवार यांची NCP-शरदचंद्र पवार गटाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती
महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई (औरंगाबाद) दि २६ जून :– नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाने पक्ष संघटनेला नवे बळ देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पक्षासाठी आजवर दिलेल्या योगदानाची दखल घेत राजेश शिवाजीराव पवार यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी दिनांक २५ रोजी अधिकृत पत्राद्वारे जाहीर केली. या पत्रात त्यांनी विश्वास व्यक्त केला की, "पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी आणि विचारधारेच्या प्रचारासाठी राजेश पवार हे सर्वशक्तीनिशी कार्य करतील. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खा. शरदचंद्र पवार साहेब यांचे विचार समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचविण्यात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील."
या नियुक्तीनंतर पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी काळात पक्षबांधणीसाठी हा निर्णय परिणामकारक ठरणार असल्याचे नेतेमंडळींचे म्हणणे आहे.
यावेळी जिलाध्यक्ष पाडुरंग तांगडे पाटील, विश्वजीत चव्हाण, सुशील बोर्ड, भुषण तांबे, आदी मान्यवर उपस्थित होते.
राजकीय घडामोडींसाठी वाचत रहा – तुमचे विश्वासू न्यूज पोर्टल!